!! “जय संयुक्त महाराष्ट्र” !!
‘ संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील १०६ हुतात्म्यांना मानाचा मुजरा’
१ मे १९६० ला मराठी भाषकांचे महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले त्यासाठी प्रखर लढा द्यावा लागला मराठी रक्त सांडावे लागले. ज्या मुंबईसाठी मराठी भाषिक राज्यासाठी आंदोलने झाली ती मुंबई महाराष्ट्रात आहे पण महाराष्ट्रात मुंबई कोठे आहे. संयुक्त महाराष्ट्र झाला तेव्हा मुंबईत ७० टक्के मराठी माणुस राहत होता.आता तो ३० टक्केही नाही.
मी केलेली मराठी माणसाची व्याख्या- मराठी भाषक म्हणजे मग तो कोणत्याही जाती धर्माचा(मराठी -हिंदु,मुस्लिम,बौद्ध,जैन,ख्रिच्छन,इ.) असो,मराठी भाषक नसुनही अस्खलित मराठी बोलणारा असो .पुरोगामी महाराष्ट्र राज्याचा ज्याला अभिमान आहे असा. (ही माझ्या मताप्रमाणे मराठी भाषक माणसाची व्याख्या)
त्याचप्रमाणे विदर्भ,कोकण,खान्देश,उ.,प.महाराष्ट्र,मराठवाडा हे महाराष्ट्रातील प्रदेश एकत्र नांदावे ही इच्छा .
आणि हे तर महत्वाचे बेळगाव,कारवार,निपाणी सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहीजे. (कधी होणार माहीत नाही पण झालाच पाहिजे)
राज्याची शोकांतिका- परप्रांतियांची समस्या,विज टंचाई,शेतकऱ्यांच्या आत्महत्या, इ. महाराष्ट्राला संकटे भेडसावत आहे . मराठी माध्यमाच्या शाळा शहरी भागात बंद पडत आहेत (खास करून मुंबईत). ज्या मुंबईसाठी संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा झाल्या त्या मुंबईत मराठी माणसाची टक्केवारी कमी होत चाललीय. आपणच मराठी भाषेला फाशी देतोय असे वाटते . खैरलांजी प्रकरणामुळे महाराष्ट्र अजुनही पुरोगामी आहे असे वाटत नाही. कोणता पक्ष ,संघटना महाराष्ट्र राज्याचा विकास करू शकतो हे कळत नाही. अजुनही मराठी पंतप्रधान का झाला नाही.