Arkib bagi Uncategorized

एक आदर्श वसाहत -कन्नमवार नगर ,विक्रोळी (पूर्व),मुंबई

कन्नमवार नगर ,विक्रोळी येथील भागाविषयी आम्हाला मिळालेली माहीती. मध्य रेल्वेच्या विक्रोळी (पुर्व )या उपनगरापासून अवघ्या १५ मिनिटांवर कन्नमवार नगर आहे. या नगराचे दोन भाग आहेत कन्नमवार नगर १ व २.महापालीकेच्या ‘एस ‘ विभागात हा प्रभाग येतो. प्रभागाचा क्रमांक आहे ११२.साधारण ६० ,७० च्या दशकात वसलेली अशी ही म्हाडाची वसाहत . या वसाहतीने आशिया खंडातील सर्वात मोठी म्हाडाची आदर्श वसाहत म्हणुन नाव मिळवलेले आहे. एकुण २६५ इमारती ,प्रत्येक इमारतीला स्वतंत्र नंबर, एक कामगार कल्यांण मंडळ, महानगर पालिकेचे क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालय, विकास हायस्कूल शाळा समुह,माध्यमिक विधालय,डॊ.बी.आर आंबेडकर भवन, अस्मिता महाविधालय, पोलीस स्टेशन ,बस इ. सेवा या विभागात येतात. एक अस्सल मराठमोळी मध्यमवर्गी वसाहत म्हणजेच कन्नमवारनगर असे आपण म्हणू शकतो. खेळाचे गोलाकार असे छत्रपती संभाजी मैदान हे तर येथील वैशिष्ट्ये आहे. तेथील कट्टे व म्युझिकल जॉगिंग ट्रॅक सकाळी (पहाटे पासूनच आणि संध्याकाळी हाऊसफुल असतात. वृध्द मंडळीचे प्रभात मित्र मंडळ तर तेथे प्रसिध्द आहे. अजुन खेळाचे मैदान म्हणजे हुतात्मा रविंद्र म्हात्रे मैदान तेथील उत्कर्ष व्यायामशाळा दहीहंडी, शरीरसौष्ठव स्पर्धा ,उत्कर्ष व्याख्यानमाला या करीता प्रसिध्द आहे. या विभागात बस क्रं ३९४,३९७ (कन्नमवार नगर ते विक्रोळी स्टेशन(पुर्व), ३५४ (कन्नमवार नगर ते शिवाजी पार्क), ३८८ (कन्नमवार नगर ते पोयसर आगार), १८५ (कन्नमवार नगर ते मजास आगार) या शिवाय पुर्वद्रुतगती मार्गावरून ३६८ (शिवडी,मुलुंड(पुर्व)),३७३(वांद्रे स्टेशन (प) ते वैशाली नगर (मुलुंड,प.),३५३ (वडाळा आगार,टागोर नगर ५ ) या बेस्टच्या बससेवा उअपलब्ध आहेत. या विभागात अजिबात रहदारी नाही. सर्वत्र हिरवीगार झाडे नजरेस पडतात. या विभागाला लागूनच पुर्वद्रुतगती मार्ग आहे. येथे फक्त राहण्यासाठीच वसाहत आहे . व्यापारी संकुल् नाहीत. लोकशाहीर विठ्ठल उमप,संगितकार विठ्ठल शिंदे, माजी महापौर दत्ता दळवी, नाट्यनिर्माते जनार्दन लवंगारे, खासदार एकनाथ गायकवाड, जेष्ठ पत्रकार काकासाहेब पुरंदरे, प.म. राऊत सर(मुख्याधापक विकास हायस्कूल शाळा समुह),साहित्यीक वामनराव होवाळ, इत्यादी मान्यवर व्यक्ती येथे राहतात. सर्वात आधी काँग्रेसचा बालेकिल्ला हा विभाग होता. अलकाताई देसाई नगरसेवक म्हणुन सतत येथून निवडून येत होत्या. अचानक वारे पालटले (साधारण ९० च्या दशकात)आणि शिवसेनचा बालेकील्ला म्हणुन कन्नमवारनगर नावारुपाला आले त्यामुळे नगरसेवक दत्त्ता दळवी यांना महापौर पदाचा मान मिळाला. पण मागिल मनपा निवडणूकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मंगेश सांगळे येथुन विजयी झाले. आता हा विभाग मनसेचा बालेकिल्ला होण्याच्या मार्गावर आहे. पण या म्हाडावसाहतीत पुर्नविकासाचे वारे वाहू लागले आणि येथील वातावरण पलटत आहे. एक अस्सल मराठमोळी वसाहत नष्ट होणार की काय अशी भिती वाटायला लागलेली आहे. विकासक येथे येत आहेत आणि येथील रहीवाशांना उंच ,उंच टॉवर ची स्वप्न दाखवत आहेत. काही स्थानिक माणसेही या विकासकांना सामिल आहेत. त्यामुळे काय होणार या नगराचे ही चिंता लागुन राहीली आहे .आतापर्यंत येथील ५ इमारती विकासकाच्या(बिल्डर हो) ताब्यात गेल्या आहेत. त्यामुळे आपण एकदा याच कन्नमवार नगर पाहून

श्रेष्ठ कोण -धर्म ,विज्ञान का निसर्ग

मानवजन्म ही नैसर्गिक प्रक्रीया आहे .माणुस जन्माला आल्यावर त्याला माहीत असते का  त्याचा धर्म कोणता ,जात कोणती ते ? तर नाही. जसाजसा तो  मोठा होत जातो  त्याला कळु लागते . आपल्या धर्माबाबत. मानवाने आपल्या तल्लख बुद्धीने निरनिराळे शोध लावले. त्याप्रमाणे आपल्या राहणीमानात बदल केले.तरी पण श्रेष्ठ कोण हा प्रश्न उरतोच कारण प्रत्येक माणसाला धर्म आहे. त्याबरोबर विज्ञानाची जोड आहे.प्रत्येक जण निसर्गात वावरतो.

प्रत्येक धर्म हा मानवनिर्मित आहे. विज्ञान(तंत्रज्ञान) ही मानवनिर्मित आहे. निसर्गातिल प्रत्येक घटकाच्या मागे विज्ञान आहे. जन्मानंतर मृत्यु हे नैसर्गिक आहे ते कोणी थांबवू शकत नाही. तंत्रज्ञानात कितीही प्रगती झाली तरी विज्ञान सर्व गोष्टींवर मात करू शकत नाही. निसर्गाच्या प्रकोपापुढे सर्व काही समान आहे(उदा. धरणीकंप, चक्रिवादळे,इ) .

व्यसनाधीनता

लोकांना बऱ्याच प्रकारची व्यसन असतात. पण आपण म्हणतो ती व्यसनाधीनता म्हणजे सिगारेट ,दारू,गुटखा,जुगार,बाईचा नाद हे होय. बहुतेक सर्व व्यसनांमध्ये एक समानता असते. उदाहरणे द्यावयाचे झाल्यास पुढीलप्रमाणे -सिगारेटचे देता येईल .बिडी ओढणाऱ्यांपासुन ५५५ चे पाकीट ओढणारा .म्हणजेच व्यसनांची किंमत ही खालपासुन वरपर्यंत वाढत जाते. दारू च घ्या देशी पिणाऱ्यांपासुन उंची विदेशी पिणाऱ्यांपर्यंत .दुर्दैवाने म्हणाव लागत पण ती वस्तुस्थिती आहे वेश्या-बाजरात ही अशीच चढणारी आणि उतरणारी किंमत असते. आता गुटखा खाणाऱ्यांनाच विचारा मधला ‘ ट’ काढल्यास बहुधा ते काय खात असतील यांची कल्पना त्यांना येत असेल. जुगार खेळणाऱ्याचे ही तसेच आहे . छोटी खेळी खेळता खेळता मोठी खेळी तो कधी खेळू लागतो ते त्याच त्याला कळत नाही. म्हणजेच आपण अर्थ काढू शकतो की व्यसने ही सर्व वर्गासाठी आहे पण ऐपतीप्रमाणे . गरीबांची व्यसने वेगळी, मध्यमवर्गाची वेगळी , उच्चभ्रु वर्गाची वेगळी . लहानपणी वाचले होते भुगोलाच्या पुस्तकात विविधतेतच एकता आहे ती एकता बहुधा  व्यसनांना लागू पडते. आपण म्हणतो तो वाया गेलाय का तर तो सिगारेट पितो. पण सिगारेट पिणारा वाया कसा जातो ते हळूहळू लक्षात येते.आधी सिगारेट मग दारू मग पुढेपुढे व्यसनांची पायऱ्या चढत तो कसा वाया जातो आणि आपण त्याच्यासाठी एक गाण ही म्हणतो -काय होतास तु काय झालास तु ,अरे वेड्या मुला वाया गेलास तु. पण आपल दुर्देव असे की हल्ली व्यसन ही फॅशन बनलीय. काळाप्रमाणे चालणे आपल्याला आवडत असल्याने आपण बहुधा व्यसनांकडे दुर्लक्ष करतो .आपला शारीरीक व मानसिक  ऱ्हास होतोय हे आपण विसरतो. किंवा कळतय पण वळत नाही. म्हणूनच कोणितरी म्हटलय व्यसन हे कधीही सुटत नाही ते सोडण्यासाठी निश्चय करावा लागतो. चला पाहूया निश्चय करून.

प्रेम कसे करावे.

प्रेम कसे करावे पण एखाद्या सुंदर तरूणीवर.सर्वच तरूण आणि तरूणी एका विशिष्ट वयात आल्यावर प्रेमात पडतात. त्यातील काही जण प्रियकर प्रेयसी होतात उरलेले एकतर्फी प्रेम करतच असतात. पण एकतर्फी प्रेमाला वयाचे बंधन नसते लग्न झाले असले तरिही माणसाला कोणिना कोणी आवडत असतेच. एकतर्फी प्रेम हे मुक असते . त्यातून ज्या घटना घडतात किंवा त्या प्रेमाचा जो उद्रेक होतो प्रेयसीला संपवण्यात तो चुकीचा आहे. तर आपला विषय पुर्णत:हा वेगळा आहे .एखाधा सुंदर तरूणीवर प्रेम कसे करावे. सुरवातीला माणूस जेव्हा प्रेम करायला लागतो तेव्हा ते एकतर्फीच असते. प्रेमाची व्याख्या कोणिही सांगू शकत नाही. ते कसेही होऊ शकते. असे असले तरिही मूळ प्रश्न राहतोच प्रेम कसे करावे. आपण जिच्यावर प्रेम करतो ती आपली होईल का कधीतरी असा आपण विचार करत असतो. पण ते प्रेम व्यक्त करायला नेहमी घाबरत असतो. ती नाही म्हणाली तर त्यामुळे विचारण्याच नेहमी आपण टाळत असतो. तरीही आपण प्रेम करत असतो. कधी कधी विचार करतो आयुष्य हे एकदाच मिळत असत त्या आयुष्यात तीचीही आपल्याला साथ हवी. पण आपण विसरत असतो तीलाही आयुष्य एकदाच मिळत असत. कधीतरी तिच्यासमोर आपले प्रेम आपण व्यक्त करतो होकार मिळाला तर पाच सहा दिवस हवेत उडत असतो नकार मिळाला पाच सहा दिवस दाढी वाढवून, मौन बाळगून मिळालेल्या नकाराचा निषेध व्यक्त करत असतो. तरिही आपण प्रेम करत असतोच . असे म्हणतात की विवाहाच्या गाठी आधीच बांधून ठेवलेल्या असतात हे चुकीचे आहे कारण दु:खी प्रेमविरांचे सांत्वन करण्यासाठी लिहीलेले हे वाक्य आहे. प्रेमी युगुलाला पाहून आपण मनातल्या मनात जळतो त्यातूनच मग कविता,चारोळ्या,गझल लिहू लागतो आणि आपले प्रेम प्रकट करत असतो. मनातल्या मनात विचार करत असतो तिच्याशिवाय मी जगू शकत नाही मग ती कशी माझ्याविना जगते तेव्हा आपण विसरत असतो तिलाही आयुष्य आहे विचार आहे. कधी कधी जीव धावासा वाटतो तर का फक्त एका नकारामूळे .अश्या वेळी आपल्यावर जिव असलेल्या आई ,बापाचा,नातेवाईकांचाही आपल्याला विसर पडतो ह्यालाच का आपण प्रेमाची विलक्षण ताकद म्हणतो. म्हणूनच वाटते की प्रेम कसे करावे या प्रश्नाचे उत्तरे शेवटी अनुत्तरीतच राहतो.

विचार आणि चमत्कार.

लोक नेहमीच चमत्कारावर विश्वास ठेवतात .का ते कळत नाही. थोर समाजसुधारकांचे विचार एकवेळ लोकांना पटणार नाहीत पण एखाध्या बुवाबापुने काही चमत्कार केला किंवा त्याच्या चमत्काराविषयी कळले की लागलीच काहीही विचार न करता त्या बुवाबापुचे भक्त बनायचे. बिचारे समाजसुधारक त्यांना आपले विचार लोकांना सांगताना नाकीनऊ येतात. काही जण त्यांना वेड्यात काढतात काहींना त्यांचे विचार पटतात पण उशिरा. तो पर्यंत हे समाजसुधारक काळाच्या पडधाआड गेलेले असतात. हल्ली समाजसुधारक दिसतच नाही.चमत्कारीक  बुवाबापू मात्र दिसतात. म्हणूनच वाटते बुवा,बापू होणे सोपे पण समाजसुधारक होणे सर्वात कठीण काम. तिथे अ. नि‌. स. वाले  अधूनमधून लढताना दिसतात त्यांच म्हणा ऐकतय तरी कोण. लोकांना अंधश्रद्धेबाबत काही समजावयाला गेल्यास लोक त्याला श्रद्धेचे गोंडस रुप देऊन मोकळे होतात. नेहमी विचार करतो की चमत्कारात काय एवढी मोठी शक्ती आहे की जी समाजसुधारकांच्या विचारात नाही . आपण म्हणतो हे शतक विज्ञानाचे आहे उच्च तंत्रज्ञानाचे आहे कशावरून हे सारे आपण म्हणतो निरनिराळे शोध लागले म्हणून का. हल्ली पालख्यांचे पेव फुटले आहेत लोक दुरवर चालत जातात . का जातात ते कळत नाही पण जातात हे नक्की. हल्ली देवदर्शनालाही पायी चालत जाण्याचे स्तोम वाढले आहे. काही महीन्यांपुर्वी अमिताभ बच्चन कुटूंबियांसोबत जाऊन आला. तेव्हा वाटते याला प्रचिती आली वाटते. म्हणजे हे सर्व खोट नाही खर आहे . नंतर कळते भारत हा लोकशाही प्रधान देश आहे. इथे ज्याला त्याला काहीही करण्याचा अधिकार आहे. टिका करण्याचा सुद्धा अधिकार आहे.

आमच्या संयुक्त महाराष्ट्राविषयीच्या कल्पना-

                                                                         

!! “जय संयुक्त महाराष्ट्र” !!

‘ संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील १०६ हुतात्म्यांना मानाचा मुजरा’
१ मे १९६० ला मराठी भाषकांचे महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले त्यासाठी प्रखर लढा द्यावा लागला मराठी रक्त सांडावे लागले. ज्या मुंबईसाठी मराठी भाषिक राज्यासाठी आंदोलने झाली ती मुंबई महाराष्ट्रात आहे पण महाराष्ट्रात मुंबई कोठे आहे. संयुक्त महाराष्ट्र झाला तेव्हा मुंबईत ७० टक्के मराठी माणुस राहत होता.आता तो ३० टक्केही नाही.
मी केलेली मराठी माणसाची व्याख्या- मराठी भाषक म्हणजे मग तो कोणत्याही जाती धर्माचा(मराठी -हिंदु,मुस्लिम,बौद्ध,जैन,ख्रिच्छन,इ.) असो,मराठी भाषक नसुनही अस्खलित मराठी बोलणारा असो .पुरोगामी महाराष्ट्र राज्याचा ज्याला अभिमान आहे असा. (ही माझ्या मताप्रमाणे मराठी भाषक माणसाची व्याख्या)

त्याचप्रमाणे विदर्भ,कोकण,खान्देश,उ.,प.महाराष्ट्र,मराठवाडा हे महाराष्ट्रातील प्रदेश एकत्र नांदावे ही इच्छा .
आणि हे तर महत्वाचे बेळगाव,कारवार,निपाणी सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहीजे. (कधी होणार माहीत नाही पण झालाच पाहिजे)
राज्याची शोकांतिका- परप्रांतियांची समस्या,विज टंचाई,शेतकऱ्यांच्या आत्महत्या, इ. महाराष्ट्राला संकटे भेडसावत आहे . मराठी माध्यमाच्या शाळा शहरी भागात बंद पडत आहेत (खास करून मुंबईत). ज्या मुंबईसाठी संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा झाल्या त्या मुंबईत मराठी माणसाची टक्केवारी कमी होत चाललीय. आपणच मराठी भाषेला फाशी देतोय असे वाटते . खैरलांजी प्रकरणामुळे महाराष्ट्र अजुनही पुरोगामी आहे असे वाटत नाही. कोणता पक्ष ,संघटना महाराष्ट्र राज्याचा विकास करू शकतो हे कळत नाही. अजुनही मराठी पंतप्रधान का झाला नाही.

महाराष्ट्र !!

नमस्कार,

! जय महाराष्ट्र !

p25.gif (117737 bytes)

आमच्या महाराष्ट्र राज्याला थोर संत, पुरूष यांचि फार मोठी परपंरा आहे.छत्रपती शिवाजी महाराजांपासून,महात्मा फुले,शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत महाराष्ट्र राज्याचा इतिहास आहे. विचारधारा आहे.  पुरोगामिपण हे राज्याचे वैशिष्ट्य आहे.

180px-shivaji_maharaj_11.jpg

छत्रपति शिवाजी महाराज-

जन्म- १९फ़ेब्रुवारी ,सन १६३०,शुक्रवार

मृत्यु- ३ एप्रिल,सन १६८०, शनिवार

!!मराठी राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे होय!!

!! वरील चारही महापुरुषाना मानाचा मुजरा !!

——————————————————————————————————————————